औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी मिळाली नाही म्हणून नेते नाराज झाल्याच्या आणि पक्ष सोडल्याच्या अनेक बातम्या तुम्ही रोज वाचत असालच. पण यात एक अजब प्रकार समोर आला आहे. लोकसभेची उमेदवारी न दिल्यामुळे काँग्रेस पक्षातील एका नेत्याने थेट ऑफिसमधल्या खुर्च्य़ा घेऊन गेले.

लोकसभेचं तिकीट न मिळाल्यामुळे नाराज असलेले काँग्रेसचे अब्दुल सत्तार यांनी समर्थकांच्या मदतीने मंगळवारी पक्षाच्या स्थानिक कार्यालयातून 300 खुर्च्या उचलल्या. सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी काँग्रेसला राजीनामा दिला आहे. मी पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे कार्यालयातील माझ्या खर्चातून आणलेल्या खुर्च्या मी घेऊन जात असल्याचं सत्तार यांनी म्हटलं आहे.

काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी 'गांधीभवन' या कार्यालयात महाआघाडीची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह एक बैठक आयोजित केली होती. अगदी त्याचवेळी सत्तार समर्थकांसोबत तिथे पोहचले आणि त्यांनी कार्यालयातल्या सगळ्या खुर्च्या उचलल्या.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours