मुंबई, 27 मार्च: भाजपचे वाचाळवीर खासदार किरीट सोमय्या समोरच्या अडचणी पुन्हा वाढल्या आहेत. काल वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांकडे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पुन्हा सोमय्या यांची तक्रार केली आहे. राज्यात शिवसेना भाजपचे कार्यकर्ते एक झाले आहेत. पण ईशान्य मुंबईत युतीत मीठाचा खडा टाकणाऱ्या किरीट सोमय्यांना तिकिट देऊ नका, अशी मागणीच शिवसैनिकांनी केली आहे.
शिवसैनिकांच्या आक्रमक विरोधामुळे भाजपकडून ईशान्य मुंबईची उमेदवारी अजुनही घोषीत करण्यात आलेली नाही. त्यामुळे आता पुन्हा शिवसेनेच्या तक्रारीनंतर मुख्यमंत्री काय निर्णय घेतायत याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours