पुणे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी एका सभेत अजित पवारांची फिरकी घेतली. साहेबांचं आता वय झालं असं अजित पवार यांनी म्हटलं होतं. त्याचा संदर्भ देत पवार म्हणाले, अजितने सांगितलेली एक गोष्ट मला नाही आवडली नाही, साहेबांचं वय झालं...अरे मी काय म्हातारा झालो का असा मिष्किल सवाल त्यांनी केला. मी या देशात परिवर्तन केल्याशिवाय गप्प बसणार नाही असंही ते म्हणाले.
पवारांनी या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केला. पवार म्हणाले, नरेंद्र मोदी म्हणतात माझी 56 इंचाची छाती आहे. मात्र असं असताना मोदींना राफेल ची कागदपत्र सांभाळता आली नाही. लोकांच्या मनात राफेलविषयी संशय आहे. तो संशय दूर झाला पाहिजे.
56 इंचाची छाती सांगतात आणि हल्ला झाला त्यानंतर आम्हाला सर्वपक्षीय बैठकीसाठी बोलवून ते धुळ्याला येऊन भाषण देतात. मोदींनी त्यावेळी जवानांच मनोधैर्य वाढवायला जायला हवं होतं अशी टीकाही त्यांनी केली.
Post A Comment:
0 comments so far,add yours