मुंबई : लोकसभेच्या राजकीय युद्धाला सुरूवात झालेली असतानाच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी युद्धात न उतरण्याची भूमिका घेतली आहे. राज ठाकरेंची ही भूमिका अनपेक्षीत नसली तरी कार्यकर्त्यांचं मनोबल खच्ची करणारं असल्याचं मत राजकीय निरिक्षकांनी व्यक्त केलंय. मनसेचा पाठिंबा आणखी कमी होत जाणार असल्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे. या निर्णयामुळे मनसेपासून कार्यकर्ते आणि मतदारही दूरावत जाणार असल्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे.
करिष्मा, आक्रमकपणा, वक्तृत्व आणि खंबीर नेतृत्व राजाकरणात आवश्यक असणारे हे  सर्व गुण राज ठाकरे यांच्याकडे असतानाही मनसे दिवसेंदिवस आपला पाठिंबा गमावत चालल्याचं दिसचं आहे. राज ठाकरे यांच्या धरसोड वृत्तीमुळेच मनसेची ही स्थिती झाल्याचं मत दैनिक लोकमतचे वरिष्ठ सहाय्यक संपादक यदू जोशी यांनी व्यक्त केलंय.
यदू जोशी म्हणाले, राज ठाकरेंनी 2014 ची निवडणुकही लढवली नाही. मनसेची नाशिक आणि पुणे महापालिकेची सत्ता गेली. मुंबईत जे त्यांचे 6 नगरसेवक होते त्यातले बहुतांश नगरसेवक पक्ष सोडून गेले. मनसेचे जुन्नरचे एकमेव आमदार असलेले शरद सोनवणे यांनीही नुकताच शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे मनसेचं मनसेचं विधानसभेतलं उरलं सुरलं प्रतिनिधीत्वही गेलं आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours