भाईंदर, 30 मार्च : आई आणि मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना भाईंदरमध्ये घडली आहे. एका 45 वर्षांच्या व्यक्तीनं आपल्या 80 वर्षांच्या आईचं डोकं जमिनीवर आपटून तिची निर्घृण हत्या केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. रमा मित्रा असे हत्या करण्यात आलेल्या वृद्ध महिलेचं नाव आहे. भाईंदर पश्चिम परिसरातील मांडवी तलावाजवळील ही धक्कादायक घटना आहे. प्रतीक्षा सोसायटीमध्ये राहणाऱ्या सोमनाथ मित्राने (वय 45 वर्ष) आपल्याच आईचं डोकं जमिनीवर आपटून तिची हत्या केली आहे. स्वतःच्याच आईला आपण जीवे मारलं आहे, या गोष्टीचा किंचतसाही पश्चाताप सोमनाथच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता. कारण रक्तानं माखलेले हात घेऊन तो घराच्या खिडकीवर येऊन बडबड करत होता.
मन विचलित करणारे हे दृश्य परिसरातील नागरिकांनी पाहिलं आणि तातडीनं याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी मुलाला ताब्यात घेतलं आणि महिलेचा मृतदेह पोस्टमार्टेमसाठी भाईंदरमधील टेम्भा हॉस्पिटलमध्ये पाठवला. सोमनाथनं आईची हत्या का केली? या मागील कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. हत्येमागील कारण शोधण्यासाठी पोलीस कसून तपास करत आहेत.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours