प्रियांका चोप्रा आणि निक जोनस डिसेंबर मध्ये 2018 मध्ये उमेद भवन पॅलेसमध्ये विवाहबद्ध झाल्यावर मोठ्या प्रतिक्षेनंतर त्यांच्या लग्नाचे फोटो समोर आले आणि या ग्रँड वेडींगचा थाट पाहून सर्वांचेच डोळे दिपले. मात्र प्रियांकाच्या सासूबाईंना काही हे फोटो आवडलेले नाहीत.
प्रियांकाच्या सासू डेनिस जोनस यांच्या मते निक-प्रियांकाचं ग्रँड वेडींग जेवढ भव्य पद्धतीनं पार पडलं त्याप्रमाणे ते फोटोग्राफरनी कॅप्चर केलं नाही. त्या सांगतात, यापेक्षाही अधिक भव्य पद्धतीनं हे फोटोशूट होऊ शकलं असतं मात्र तसं झालं नाही. प्रत्यक्षातला शाही अंदाज त्या फोटोमध्ये दिसायला हवा होता तसा दिसला नाही.
निक आणि प्रियांकानं हिंदू आणि ख्रिश्चन अशा दोन पद्धतीनं लग्न केलं या लग्नातील अनुभव काही दिवसांपूर्वी प्रियांकानं एका चॅट शो मध्ये शेअर केला. लग्नाच्या वेळी माझ्यापेक्षा निक जास्त रडत होता असं प्रियांकानं या शोमध्ये सांगितलं.
Post A Comment:
0 comments so far,add yours