मुंबई, 27 एप्रिल : ईस्टर डेच्या दिवशी श्रीलंकेत झालेल्या पार्श्वभूमिवर आता देशात देखील दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण, बंगळूरू पोलिस ठाण्यात एका व्यक्तिनं 8 राज्यांमध्ये दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता असल्याची माहिती दिली. त्यामुळे कर्नाटकच्या डीजीपींनी केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगना, महाराष्ट्र, गोवा आणि पॉडेचेरी या राज्यांना पत्र पाठवून त्याबाबतची कल्पना दिली आहे. तसंच फोनवरून माहिती देणाऱ्या व्यक्तिनं 19 दहशतवादी तामिळनाडूमधील रामनाथपूरम येथे असल्याची देखील माहिती दिली आहे. ईस्टर डेच्या दिवशी श्रीलंकेत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जवळपास 253 लोकांना आपले प्राण गमवावे लागले. त्यानंतर आता देशात देखील दहशतवादी हल्ल्याची शक्यता लक्षात घेत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. प्रमख ठिकाणांच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये देखील वाढ करण्यात आली आहे.
तामिळनाडूमध्ये 19 दहशतवादी
तामिळनाडूमधील रामनाथपूरम येथे 19 दहशतवादी लपून बसल्याची माहिती देखील यावेळी फोन करणाऱ्या व्यक्तिनं दिली. मूर्ती हे ट्रेक ड्रायव्हर असल्याचा कळतंय. स्वामी सुंदर मूर्ती असं या फोन करणाऱ्या व्यक्तिचं नाव आहे. शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजता स्वामी सुंदर मूर्ती यानं बंगळूरू पोलिस ठाण्यात फोन करून त्याबाबतची माहिती दिली. दहशतवादी हे ट्रेनमध्ये हल्ला करू शकतात अशी माहिती फोनवरून देण्यात आली आहे. त्यानंतर आता सुरक्षा व्यवस्थेमध्ये देखील वाढ करण्यात आली आहे.
तामिळनाडूतील प्रसिद्ध ब्रीज उडवण्याची धमकी
दरम्यान, एका व्यक्तिनं चेन्नई पोलिसांना फोन करून तामिळनाडूतील प्रसिद्ध पंबन सी ब्रिज उडवण्याची धमकी देखील दिली आहे. यानंतर बॉम्ब शोधक पथकाच्या साहाय्यानं सर्च ऑपरेशन करण्यात आलं.
श्रीलंकेतील हल्ल्यानंतर भारतानं आपल्या सागरी सीमांच्या सुरक्षेमध्ये देखील वाढ केली आहे. प्रमुख ठिकाणी तपासणी आणि सुरक्षा व्यवस्थेत देखील वाढ करण्यात आली आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours