नवी दिल्ली, 14 एप्रिल : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता जोरदार सुरूवात झाली आहे. उमेदवार आपला लोकसभा मतदारसंघ पिंजून काढत आहे. दरम्यान, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी अमेठीसह केरळमधील वायनाड या ठिकाणाहून देखील लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. जोरदार शक्तीप्रदर्शन करत राहुल गांधी यांनी वायनाड आणि अमेठी या दोन्ही ठिकाणाहून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दोन्ही मतदारसंघात सध्या काँग्रेस प्रचार देखील जोरात करत आहे. शिवाय, प्रियांका गांधी देखील राजकारणात उतरल्यानं काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहायाला मिळत आहे. भाऊ राहुल गांधी यांच्यासाठी आता प्रियांका गांधी यांनी देखील कंबर कसली आहे.
वायनाडमध्ये देखील प्रियांका करणार प्रचार
दरम्यान, प्रियांका गांधी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या प्रचारार्थ वायनाड येथे रॅली काढणार आहेत. 20 आणि 221 एप्रिल रोजी प्रियांका गांधी या वायनाडमध्ये प्रचार करतील. 15 एप्रिल ते 27 एप्रिल या दरम्यान प्रियांका गांधी देशभर झंझावती दौरे करणार आहेत. 23 एप्रिल रोजी प्रियांका उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथे प्रचार करतील. त्यानंतर देशातील विविध भागांमध्ये प्रियांका गांधी प्रचार करणार आहेत.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours