मुंबई, 13 एप्रिल: 'भाऊ माझ्यापेक्षा चांगले काम करेल', या भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांच्या वाक्याचा वापर करुन राष्ट्रवादी काँग्रेसने एक गीत तयार केले आहे. राष्ट्रवादीच्या या प्रचारगीतावरून आता नवा वाद सुरु झाला आहे. राष्ट्रवादीचे ईशान्य मुंबई मतदारसंघातील उमेदवार संजय दिना पाटील यांच्या प्रचारासाठी पक्षाने सोमय्या यांचे विधान वापरले आहे. यावरून आता सोमय्या यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. 
सोमय्या यांनी भाजपचे उमेदवार मनोज कोटक यांना उद्देशून हे विधान केले होते. सोमय्या यांच्या उमेदवारीवरून बराच वाद झाल्यानंतर भाजपने मनोट कोटक यांना उमेदवारी दिली होती. या उमेदवारीनंतर सोमय्या यांनी कोटक यांचा लहान भाऊ असा उल्लेख केला होता. माझा भाऊ माझ्यापेक्षा चांगले काम करेल, असे ते म्हणाले होते. त्याच्या या वाक्याचा वापर करत राष्ट्रवादीने एक गीत तयार केले. या गीताच्या सुरुवातीला सोमय्या यांचे वाक्य वापरण्यात आले आहे. त्यानंतर संजय पाटील यांचे फोटो वापरुन अरे आला.. आपला भाऊ भाऊ असे... शब्द वापरले आहेत. 
याप्रकरणी सोमय्या यांनी उत्तर पूर्व मुंबईचे निवडणूक अधिकारी विवेक गायकवाड यांच्याकडे लेखी तक्रार दिली आहे. माझा व्हिडीओ वापरुन माझा अपप्रचार आणि माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. या व्हिडिओ संदर्भात भांडूप पोलीस तपास करत आहेत. 
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours