जळगाव, 11 एप्रिल : आपल्याकडे निवडणूक जिंकून येण्यासाठी टेक्निक आहे असं वक्तव्य गिरीश महाजन यांनी केलंय. महाजन हे संकट मोचक म्हणून ओळखले जातात. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याची कायम चर्चा होते असते. या आधीही त्यांनी आता बारामतीही जिंकू असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे त्याचीही राज्यात चांगलीच चर्चा झाली होती.
महाजन म्हणाले, आपल्याकडे निवडणूक जिंकून येण्याची टेक्निक आहे. तंत्रज्ञान इतकं पुढे गेलं आहे की सोशल मीडियाच्या माध्यमातून मतदाता जागृत कसा करावा याची आपल्याला कल्पना आहे. साहित्य दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह येतो आणि कामाला गती येते अशा प्रकारे आपल्याला निवडणुका जिंकता येतात असा  दावा गिरीश महाजन यांनी केला आहे.
अनिल गोटे यांनी डिपॉझिट वाचून दाखवावं असं आव्हानही गिरीश महाजन यांनी जळगाव येथे मेळाव्यादरम्यान केलं होतं. महाजन म्हणाले, धुळे येथे अनिल गोटे यांच्या गल्लीत जाऊन आपण अनिल गोटे यांच्या घरासमोर सांगितलं आहे की अनिल गोटे यांनी आपले डिपॉझिट वाचून दाखवावं.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours