मुंबई, 08 एप्रिल : लोकसभा निवडणुकीकरता मुंबईत आता सर्वच पक्षांनी आणि उमेदवारांनी जोरदार प्रचार करायला सुरूवात केली आहे. दरम्यान, आजचा दिवस हा उमेदवारी अर्ज भरण्याचा दिवस म्हटलं तर काहीही वावगं ठरणार नाही. कारण, मुंबईतील उमेदवार आज आपला उमेदवारी अर्ज दखल करणार आहेत. जोरदार शक्ती प्रदर्शन करत आज उमेदवारी अर्ज दाखल केले जातील. भाजप खासदार पूनम महाजन यांनी यापूर्वीच उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा दक्षिण मुंबईतून तर, एकनाथ गायकवाड दक्षिण मध्य मुंबईतून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. दुपारी 2 वाजण्याच्या दरम्यान मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये उमेदवारी अर्ज दाखल केले जातील.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours