मुंबई, 8 एप्रिल : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून शेतकरी प्रश्नांसंदर्भात भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 'या वर्षी पावसाने आधीच दगा दिला, तरीही शेतकऱ्याने कसेबसे पीक वाढवले. आता ते पीकही हातचे गेले, पण शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करायला सरकार जागेवर नाही. सरकारी यंत्रणा देशाच्या शक्तिशाली वगैरे लोकशाहीच्या रक्षणासाठी निवडणुकीच्या मैदानात आहे व शक्तिशाली शेतकरी साफ कोलमडून पडला आहे. ना सरकार, ना विरोधी पक्ष, ना प्रशासन! शेतकऱ्याने फिर्याद मांडायची कोणाकडे?'अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजप तोफ डागली आहे.
काय आहे आजचे सामना संपादकीय?
- गरीब आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सगळ्याच राजकीय पक्षांना पान्हा फुटला आहे. लोकसभा निवडणुकांतील प्रचार सभांतून आपणच कसे शेतकऱ्यांचे ‘मायबाप’ आहोत हे सिद्ध करण्याची चढाओढ सुरू आहे. जणू सगळ्याच लांडग्यांच्या अंगात हत्तीचा संचार झाला आहे. एखादा मोठा हत्ती पिसाळल्यावर ज्याप्रमाणे तो वाटेल तशी धुळधाण करीत सुटतो तशी आमच्याकडील सर्वपक्षीय राजकारण्यांची स्थिती झाली आहे.

- मराठवाडय़ातील अनेक भागांत अवकाळी पाऊस व गारा पडल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. तेथील बीड, हिंगोली, नांदेड आणि लातूर जिल्हय़ांना त्याचा फटका बसला. आंबा आणि द्राक्ष या दोन्ही पिकांचे नुकसान झाले. विदर्भातही काही ठिकाणी हेच वादळवारे सुटले व शेतातील पिकांचे नुकसान झाले. पंढरपूर व आसपासच्या परिसरात पाऊस पडला द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.  या वर्षी पावसाने आधीच दगा दिला, तरीही शेतकऱ्याने कसेबसे पीक वाढवले. आता ते पीकही हातचे गेले, पण शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करायला सरकार जागेवर नाही.
- सरकारी यंत्रणा देशाच्या शक्तिशाली वगैरे लोकशाहीच्या रक्षणासाठी निवडणुकीच्या मैदानात आहे व शक्तिशाली शेतकरी साफ कोलमडून पडला आहे. ना सरकार, ना विरोधी पक्ष, ना प्रशासन! शेतकऱ्याने फिर्याद मांडायची कोणाकडे?
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours