बारामती, 12 एप्रिल : 'निवडणुका आल्या की विरोधक येतात, बारामतीत  भाषणबाजी करतात. पण बारामतीच्या विकासाच्या पॅटर्नबाबत मी कुणालाही चॅलेंज करते,' असं म्हणत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे.
'विरोधक आमच्यावर टीका करतात आणि निघून जातात. पुन्हा पाच वर्षे ते फिरकतच नाहीत. नुसती भाषणं करणं फार सोप असतं. या भागात  विविध विकास कामं केली आहेत. बारामतीबद्दल या सर्व नेत्यांना प्रेम होतं तर एकाने तरी बारामतीचा दुष्काळी दौरा केलाय का,' असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघ आगामी पाच वर्षात टँकरमुक्त होण्यासाठी, तसंच भूगर्भातील पाण्याची पातळी कशी वाढेल, यासाठी प्रयत्न  केला जाईल, असं आश्वासनही सुप्रिया सुळे यांनी दिलं आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours