भिवंडी, 29 एप्रिल : लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी आज राज्यातील चौथ्या आणि अंतिम टप्प्यामध्ये मतदान होणार आहे. पण यातच एका तरुणाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईच्या भिवंडीमध्ये समोर आला आहे. ऐन मतदानाच्या दिवशी तरुणाची हत्या झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

भिवंडी शहरातील नवीबस्ती- नेहरुनगर इथं डोंगरीवर एका 30 वर्षीय युवकाची हत्या करण्यात आली आहे. धारदार शस्त्राने गळा चिरून तरुणाला मारण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. अजिम अयुब सय्यद ( 30 ) असं हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे.

अजिमचा मित्र जलालुद्दीन मोहम्मद शेख यांनेच त्याची हत्या केली असल्याची माहितीही पोलिसांकडून देण्यात आली आहे. पण हत्येनंतर आरोपी फरार आहे. निवडणुकीतील पैशाच्या वाटपावरून त्यांच्यात वाद झाला आणि अजिमची हत्या करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours