मुंबई, 29 एप्रिल : लोकसभा निवडणुकीतील चौथ्या टप्प्यातील मतदान आज देशात होत आहे. एकूण 9 राज्यांतील 71 मतदारसंघांमध्ये नागरिक आपलं बहुमुल्य मत नोंदवणार आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील 17 जागा, उत्तर प्रदेश-राजस्थानातील प्रत्येकी 13-13 जागा, पश्चिम बंगालमधील 8 जागा, मध्य प्रदेश-ओडिशातील 6-6 जागा, बिहारमधील 5 जागा, झारखंडतील 3 जागा आणि जम्मू काश्मीरमधील एका जागेचा समावेश आहे.
महाराष्ट्रातील 15 विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे, पूनम महाजन, गजानन कीर्तिकर, गोपाळ शेट्टी, राहुल शेवाळे, अरविंद सावंत, कपिल पाटील, श्रीकांत शिंदे, राजेंद्र गावित, सदाशिव लोखंडे, राजन विचारे, श्रीरंग बारणे, शिवाजीराव आढळराव-पाटील, हिना गावित आणि हेमंत गोडसे यांची आज परीक्षा आहे.
तर दुसरीकडे, गजेंद्र सिंह शेखावत, गिरिराज सिंह, कन्हैय्या कुमार,अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव, उपेंद्र कुशवाहा, वैभव गहलोत आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे पुत्र नकुलनाथ यांचंही भवितव्य आज ईव्हीएममध्ये बंद होणार आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours