नवी दिल्ली, 03 एप्रिल: बॉलिवडूचा किंग शाहरुख खानच्या घराबाहेर गोळीबार करणारा तसेच चित्रपट निर्माता महेश भट्ट यांच्या हत्येचा कट रचणारा ओबैद रेडियोवाला मर्चंट याला अमेरिकेतील न्यू जर्सी येथून अटक करण्यात आली. गुप्तचर यंत्रणेने दिलेल्या माहितीनंतर ओबैदला अटक करण्यात आली. भारतीय तपास यंत्रणाचे अधिकारी लवकरच त्याला दिल्लीत घेऊन येणार आहेत.
ओबैद रेडियोवाला याच्यावर अनेक व्यापारी, बॉलिवूड स्टार यांनी धमकी देण्याचा आणि पैसे वसूली करण्याचा आरोप आहे. ओबैद हा रवी पुजारी टोळीतील सदस्य असून त्याने करीम आणि अली मोरानी यांच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. बॉलिवूडमधील प्रसिद्ध कोरिओग्राफर फराह खान यांच्या हत्येचा कट देखील ओबैदने रचला होता.
मुंबई पोलिस दलाच्या गुन्हे शाखाने रवी पुजारी टोळीच्या 13 जणांना एकत्र पकडल्यानंतर ओबैदचे नाव सर्वात प्रथम पुढे आले होते. या सर्वांच्या चौकशीत बॉलिवूडमधील कलाकारांची मोठी यादी पोलिसांच्या हाती आली ज्यात महेश भट्ट यांचे नाव प्रथम क्रमांकावर होते. पुजारी टोळीतील शूटरांनी पोलिसांनी अशी माहिती दिली की, अमेरिकेतून ओबैद यानेच ही यादी तयार केली होती आणि त्याने महेश भट्ट यांना मारण्यास सांगितले होते.
Post A Comment:
0 comments so far,add yours