मुंबई, 03 एप्रिल: लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरु असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आमदार जितेंद्र आव्हाड यांची राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही नियुक्ती केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळी लक्षात घेऊन पवार यांनी आव्हाड यांच्याकडे पक्षातील मोक्याचे पद सोपवले आहे. आव्हाड हे पवारांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जातात. त्यामुळेच या महत्त्वाच्या पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.
सोशल मीडिया असो किंवा अन्य प्रसारमध्यमांसमोर आव्हाड नेहमीच पक्षाची बाजू आक्रमकपणे मांडत असतात. भाजप आणि शिवसेनेवर त्यांनी अनेकदा आक्रमक टीका देखील केली आहे. दोनच दिवसांपूर्वी शरद पवारांवर टीका केली म्हणून त्यांनी भाजपचे नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार हल्ला चढवला होता.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours