मावळ: 'मी याआधी गैरसमज झाल्याने भाजपवर आरोप केले होते,' असं मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी मान्य केलं. पण त्यानंतरही शिवसेना-भाजप युतीतील वाद मिटताना दिसत नाहीत. त्यामुळे श्रीरंग बारणे यांच्यासमोरील अडचणींत वाढ झाली आहे.
श्रीरंग बारणे यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना एकजुटीने काम करण्यासाठी आवाहन करणारं निवेदन जाहीर केलं. पण त्यावर अजूनही भाजपकडून प्रतिसाद नाहीच.
दरम्यान, भाजपचे पिंपरी-चिंचवडमधील आमदार लक्ष्मण जगताप यांचा श्रीरंग बारणे यांच्या उमेदवारीला विरोध आहे. शिवसेना नेते संजय राऊत आणि भाजप नेते गिरीश महाजन यांनी आमदरा जगताप यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केल्यानंतरही तोडगा निघू शकलेला नाही.
Post A Comment:
0 comments so far,add yours