मुंबई : ईशान्य मुंबईचा भाजपच्या उमेदवाराचा तिढा अजूनही कायम आहे. एकीकडे किरीट सोमय्या यांचा प्रचार सुरू आहे तर दुसरीकडे मनोज कोटक यांनाही निवडणुकीसाठी सज्ज राहण्याची सूचना पक्षाकडून देण्यात आली आहे. मनोज कोटक यांनी सोमवारपासून ईशान्य मुंबईतील भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना निवडणुकीच्या कामाला लागण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आता यावर भाजप केंद्रीय निवडणूक समिती काय अंतिम निर्णय देणार याकडे आता सर्वांच लक्ष लागलं आहे.
ईशान्य मुंबईतून भाजपच्या मनोज कोटक यांचं नाव पुढे येत आहे. शिवसेना भाजपच्या समन्वय समितीनं दिलेल्या अहवालानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या संसदीय समितीनं हा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली होती.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours