नवी दिल्ली, 26 एप्रिल : बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित 'पीएम नरेंद्र मोदी' सिनेमाच्या रिलीजसंदर्भात सुप्रीम कोर्ट आज निर्णय देणार आहे. निवडणूक आयोगानं 19 मे म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यातील मतदानापर्यंत या सिनेमाच्या रिलीजवर बंदी आणली आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात सिनेमाच्या निर्मात्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. त्यामुळे आता निकाल कोणाच्या बाजूनं लागणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
'पीएम नरेंद्र मोदी' हा सिनेमा नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर आधारित आहे. 12 एप्रिलला हा सिनेमा बॉक्सऑफिसवर झळकणार होता. मात्र विरोधकांनी आक्षेप नोंदवल्यानंतर निवडणूक आयोगानं सिनेमाच्या रिलीज होऊ दिला नाही.
निवडणूक आयोगानं सोमवारी (22 एप्रिल) सिनेमासंबंधित आपला अहवाल सीलबंद लिफाफ्याद्वारे सुप्रीम कोर्टात सोपवला. सुप्रीम कोटाच्या आदेशानुसार निवडणूक आयोगाच्या टीमसाठी सिनेमाचं स्पेशल स्क्रीनिंग ठेवण्यात आलं होतं. सात निवडणूक अधिकाऱ्यांनी पीएम मोदींचा बायोपिक पाहिला आणि आपला सीलबंद अहवाल सुप्रीम कोर्टासमोर सादर केला.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणुकीदरम्यान सिनेमा रिलीज झाला तर एका विशिष्ठ राजकीय पक्षाला याचा फायदा होईल, असे मत निवडणूक अधिकाऱ्यांनी सिनेमा पाहिल्यानंतर नोंदवलं. दरम्यान, आज सिनेमाच्या रिलीजवर सुप्रीम कोर्ट आपला निर्णय सांगणार आहे. याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours