मुंबई, 26 एप्रिल : लोकसभा निवडणुकीसाठीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान पूर्ण झालं आहे. आता राजकीय पक्षांनी चौथ्या आणि महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्याकडे लक्ष केंद्रित केलं आहे. मतदारांवर प्रभाव पाडण्यासाठी प्रत्येक पक्षातील हायप्रोफाईल नेते मैदानात उतरल्याचं चित्र आहे. आजही महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात अनेक दिग्गज नेत्यांच्या प्रचारसभा होणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे नेते आपल्या पक्षातील उमेदवारांच्या प्रचारासाठी मैदानात असतील.
कुणाची किती वाजता सभा?

मोदी-मुख्यमंत्री-उध्दव ठाकरे सभा –मुंबई BKC – 5 वाजता
संगमनेर – राहुल गांधींची सभा - 5 वाजता
मुख्यमंत्री सभा – येवला – 11 वाजता
मुख्यमंत्री सभा – श्रीरामपूर – 10 वाजता -
राज ठाकरे सभा – अनंत कान्हेरे मैदान, नाशिक – 6वाजता
वंचित बहुजन आघाडी सभा – मनमाड – 11 वाजता, भिवंडी – 6 वाजता, मालेगाव – 2 वाजता, लोणावळा - सकाळी 11 वाजता
बविआ प्रचार महारँली - वसई-विरार - 4 वाजता
आदेश बांदेकर शिवसेना प्रचार - पालघर– 3 वाजता
धनंजय मुंडे सभा – चांदवड – 10 वाजता
डॉ अमोल कोल्हे सभा – वडाळा, नाशिक – 6 वाजता
डॉ अमोल कोल्हे – नाशिक शहरात रॅली – सकाळी 10 वाजता

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours