नवी मुंबई, 26 एप्रिल : भाजप आमदार मंदा म्हात्रे यांना हायकोर्टाने नोटीस पाठवली आहे. 'सातारा आणि नवी मुंबई या दोन्ही ठिकाणी मतदान करा,' असं वादग्रस्त वक्तव्य मंदा म्हात्रे यांनी केलं होतं. याप्रकरणी आता त्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे.
मंदा म्हात्रे यांनी मतदारांना दोन ठिकाणी मतदान करण्याचं आवाहन केल्यानं मोठा वाद निर्माण झाला. त्यानंतर ठाणे लोकसभा निवडणूक स्थगित करण्याची मागणी अपक्ष उमेदवार हेमंत पाटील यांनी केली आहे. त्यावर आज उच्च न्यायालयात स्थगितीवर होणार सुनावणी होणार आहे.
काय आहे प्रकरण?

'मतदारांनी दोनदा मतदान करावं,' असं वादग्रस्त वक्तव्य मंदा म्हात्रे यांनी केलं. युतीचे उमेदवार राजन विचारे आणि नरेंद्र पाटील यांच्या संयुक्त प्रचारसभेत म्हात्रे यांनी हे वक्तव्य केलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर मोठी टीकाही झाली.
आमदार मंदा म्हात्रे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. मतदारांची दिशाभूल करणे आणि तोतयागिरी करणे या आरोपांतर्गत निवडणूक आयोगाने हा गुन्हा दाखल केला आहे. कोपरखैरणे पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours