लातूर, 26 एप्रिल : लातूरमधील बसस्थानकात गुरुवारी मध्यरात्री गोळीबार झाल्याने मोठा गोंधळ उडाला. प्लॅटफॉर्मच्या शेजारी थांबलेल्या बसमधून एकाने गोळीबार केला. त्यानंतर या परिसराला पोलीस छावणीचं स्वरूप आलं होतं. 
अज्ञाताने बसमधून गोळीबार केल्याने स्थानक परिसरात खळबळ उडाली. हल्लेखोराने झाडलेली गोळी खिडकीजवळ असलेल्या लोखंडी रॉडवर आदळली आणि हल्लेखोरालाच लागली. यामध्ये तो किरकोळ जखमी झाला. हदगाव ही नांदेडमार्गे जाणारी बस रात्री 11:30 च्या दरम्यान लातूरच्या मध्यवर्ती स्थानकावर दाखल झाली होती. चालक- वाहक हे चहा पाण्यासाठी उतरले असता अचानक बसमधून अज्ञात हल्लेखोर प्रवाशाने गोळीबार केला. 
खिडकीमधून बाहेर उभ्या असणाऱ्या कोणालातरी मारण्याच्या उद्देशाने त्याने हा गोळीबार केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. मात्र, हल्लेखोर हा लातूरमध्ये बसला होता की कुणावर पाळत ठेवून होता, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours