मुंबई, 18 एप्रिल : लोकसभा निवडणुकीतील दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. यावेळी राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांचं भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये कैद होणार आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांच्यासह अनेक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 
महाराष्ट्राच्या दहा लोकसभा मतदार संघ यासाठी सकाळी सात ते सायंकाळ सहा असे मतदान होत आहे. राज्यातील सर्वच प्रमुख पक्षांची प्रतिष्ठापणाला लागली आहे.
आजच्या मतदानाची काय आहेत वैशिष्ट्ये?
10 मतदारसंघातील 20 हजार 716 मतदान केंद्रांवर मतदान होत आहे.
दुसऱ्या टप्प्यात 1 कोटी 85 लाख 46 हजार मतदार मतदानाचा हक्क बजावतील. 
या टप्प्यात एकूण 179 उमेदवार असून 20 हजार 716 मतदान केंद्र आहेत. 
या टप्प्यातील सर्वाधिक 36 उमेदवार बीड मतदारसंघात असून सर्वात कमी 10 उमेदवार लातूर मतदार संघात आहेत.
बुलढाणा मतदारसंघात 12 उमेदवार, अकोला 11, अमरावती 24, हिंगोली 28, नांदेड 14, परभणी 17, उस्मानाबाद 14 आणि सोलापूर मतदारसंघात 13 उमेदवार निवडणूक लढवत आहेत.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours