सोलापूर, 9 एप्रिल : सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार जयसिद्धेश्वर महास्‍वामी यांच्‍या सभेत गोंधळ निर्माण झाला. पंढरपूर तालुक्‍यातील गोपाळपूर येथे महास्वामी यांच्या प्रचारसभेचं आयोजन करण्‍यात आलं होतं. यावेळी एका युवकाने गावातील विकास कामांबद्दल प्रश्न विचारल्याने सभेत प्रचंड गोंधळ निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे.
पंढरपूरमधील प्रचारसभेत जयसिद्धेश्वर महास्‍वामी यांच्‍या भाषणावेळी एका युवकाने गावातील समस्‍या सांगत भरसभेत गोंधळ घातला. यामुळे भाजपची ही सभा आटोपती घेण्‍यात आली. यावेळी आमदार प्रशांत परिचारक यांनी युवकाची समजूत काढून त्याला शांत करण्‍याचा प्रयत्‍न केला.
एकीकडे नागरिक आपल्‍या समस्‍या सांगत असताना प्रचारसभेसाठी आलेले नेते मात्र स्टेजवरच आईस्‍क्रीम खाण्‍यात दंग होते. त्यामुळे भाजपच्या या नेत्यांवर मोठी टीका होत आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours