नवी दिल्ली, 9 एप्रिल: बऱ्याच जणांना दिवसा झोपण्याची सवय असते. यामध्ये वृद्ध आणि तरुणाईची संख्या अधिक प्रमाणात आहे. दिवसा झोपण्याची सवय तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. दिवसा झोपल्यानं तुम्हाला अल्झायमरसारखा गंभीर होऊ शकतो, असं एका संशोधनातून नुकतंच समोर आलं आहे.
300 लोकांवर याबाबतचे संशोधन करण्यात आले. ज्यामध्ये 70 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्यांचा समावेश अधिक होता. दिवसा खूप झोप येते अशी या 300 जणांची तक्रार होती. 300 लोकांचे मेंदू स्कॅन केल्यानंतर त्यात मेंदूमध्ये बीटा- अ‍ॅमलॉईडचं प्रमाण अधिक असल्याचं आढळलं ज्यामुळे त्यांना सतत झोप येत होती.
दिवसा झोपल्यामुळे मेंदूतील बीटा- अ‍ॅमलॉईडचं नावाचं प्रमाण एकतर कमी होतं किंवा ते एका ठिकाणी जमा होऊन त्याची गाठ तयार होते. यामुळे भविष्यात अल्झायमरचा धोका उद्भवू शकतो. त्यामुळे दिवसा झोपणं शक्यतो टाळावं, असं मयो क्लिनिकने केलेल्या संशोधनात म्हटलं गेलं आहे.बीटा- अ‍ॅमलॉईडचं प्रमाण अधिक असणं हे अल्झायमरसारख्या आजाराला निमंत्रण देण्याचं निमित्त असू शकतात. गोष्टी विसरणं, अति झोप येणं हे अल्झायमर होण्याची लक्षणं असू शकतं.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours