जालना: जालना लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्याविरोधात आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार करण्यात आली आहे. भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष दीपक डोके यांनी दानवेंविरोधात तक्रार करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
रावसाहेब दानवे यांनी 2 एप्रिलला उमेदवारी अर्ज भरताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे, राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यासह आपला खाजगी वाहनाचा ताफा 100 मीटरच्या परिसराच्या आतपर्यंत नेला होता. 
'वाहनांचा ताफा इतका आतपर्यंत नेणं, हे आचारसंहिता नियमाच्या विरोधात आहे. म्हणून दानवेंविरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार देत गुन्हा नोंदवण्यात यावा, अशी मागणी भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष दीपक डोके यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्याकडे केली आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours