मुंबई: मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या जाहीर सभांमधून 'लाव रे तो व्हिडिओ' म्हणत मोदी सरकारने पहिलं डिजीटल गाव म्हणून विदर्भातल्या हरिसाल या गावाबद्दलचं 'वास्तव' मांडलं होतं. परंतु, आज याच हरिसाल गावातील उपसरपंचाने फेसबुक लाईव्ह करून राज ठाकरेंचा व्हिडिओ चुकीचा असल्याचा दावा केला होता. यावर मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी 'आता तुम्ही मोदींचं फेसबुक लाईव्ह करा किंवा सोन्याची घरं बांधा तरी तुम्ही फेकूच आहात' अशी टीका केली आहे.
अमरावती जिल्ह्यातल्या हरिसाल गावाबाबतचा व्हिडिओ राज ठाकरेंनी सभेमध्ये दाखवला होता. हा व्हिडिओ चुकीचा असल्याचा दावा उपसरपंच गणेश महादेव येवले यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून केला आहे. संदीप देशपांडे यांनी यावबद्दल टि्वटकरून आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 'आता हरिसालच्या सरपंचाचा जबरदस्तीने फेसबुक लाईव्ह करा किंवा पंतप्रधानांचं करा नाहीतर हरिसालमध्ये सोन्याची घरं बांधा लोकांना पक्क समजलं आहे की तुम्ही फेकू आहात' असं प्रत्युत्तर दिलं आहे. 
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours