मुंबई, 23 मे : मुंबईतील प्रतिष्ठेची लढत म्हणजे दक्षिण मध्य मुंबईतील लोकसभेची राहुल शेवाळे विरूद्ध एकनाथ गायकवाड अशी लढत. मतमोजणीला सुरूवात झाल्यानंतर मुंबईतील या लढतीकडे देखील सर्वाचं लक्ष लागून राहिलं आहे. दक्षिण मध्य मुंबई म्हणजे दादर, माहीम यासारखा शहरी मध्यमवर्गियांचा भाग आणि धारावीमधले कष्टकरी गरीब लोक असा संमिश्र स्वरूपाचा राखीव मतदारसंघ आहे.दरम्यान, दक्षिण मध्य मुंबईतून शिवसेनेचे राहुल शेवाळे आघाडीवर आहेत. 
पुन्हा आमनेसामने
2009 मध्ये इथे काँग्रेसचे एकनाथ गायकवाड निवडून आले होते. त्यानंतर 2014 मध्ये राहुल शेवाळेंनी एकनाथ गायकवाड यांचा पराभव केला. आता पुन्हा एकदा हेच उमेदवार आमनेसामने होते.
दक्षिण मध्य मुंबईमध्ये माहीम, चेंबूर, सायन कोळीवाडा, धारावी, वडाळा, अणुशक्तीनगर या विधानसभा जागा येतात. या सगळ्या मतदारसंघात आघाडी आणि युतीचाही कस लागला.
मनसे फॅक्टर
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांना मिळणारा प्रतिसाद हाही मुंबईच्या निवडणुकीतला महत्त्वाचा मुद्दा बनला होता. राज ठाकरे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना लक्ष्य करत भाजप सरकारवर जोरदार टीका करत होते. त्यामुळे दक्षिण मध्य मुंबईत राज ठाकरे यांच्या सभांमुळे शिवसेना भाजप युतीचं नुकसान होईल का, अशी चर्चा इथे रंगली होती.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours