भंडारा जिल्हा प्रतिनीधी :शमीम आकबानी
भंडारा-- --भंडारा (बेला) येथे कार्यरत असलेले मंडळ अधिकारी हरिष नारायण चतुर यांनी शेतीचे फेरफार करण्याकरिता तक्रारदाराकडुन १,००,०००/- रु.लाचेची मागणी केली असता तडजाेडअंती ९०,०००/- करुन त्यापैकी ५०,०००/- रु.लाच स्विकारली असता त्यांच्या विरुद्ध पाेलीस स्टेशन भंडारा येथे लाच लुचपत प्रतिबंध कायदा १९८८ अन्वये गुन्हा नाेंद करण्यात आला आहे.
------ तक्रारदार हे नर्मदा हाऊसिंग साेसायटी नागपुर येथील रहिवासी  असुन यांनी माैजा हत्तीडाेई भंडारा येथे २ एकर शेती विकत घेतली हाेती सदर शेतीचे फेरफार करण्याकरिता मंडळ अधिकारी हरिष नारायण चतुर यांना शेतीचे फेरफार संबधी  भेटले असता त्यांनी तक्रारदारास शेतीचे फेरफार करण्याकरिता १,००,०००/- रु. लाचेची मागणी केली .तक्रारदारास लाच देण्याची मुळीच ईच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग येथे तक्रार नाेंदविली असता दिलेल्या तक्रारीवरुन सापळा कार्यवाही दरम्यान हरिष नारायण चतुर  मंडळ अधिकारी ,कार्यालय बेला  यांनी तक्रारदारास २ एकर शेती विकत घेतलेल्या शेतीचे फेरफार करण्याकरिता ९०,०००/- रु.घेण्यास तयार हाेवुन आज लाल बहादुर शास्त्रि माध्यमिक शाळा भंडारा चे मैदानावर ५०,०००/- रु.लाच रक्कम स्विकारली त्यावरुन आराेपी विरुद्ध आज दि.२२-५-२०१९ राेजी पाेलीस स्टेशन भंडारा येथे लाचलुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ अन्वये गुन्हा नाेंद करण्यात आला आहे।
----- सदर कार्यवाही मा.श्रि श्रिकांत धिवरे , (अतिरिक्त कार्यभार) पाेलीस उपायुक्त / पाेलीस अधिक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपुर, श्रि राजेश दुद्दलवार ,अपर पाेलीस अधिक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपुर यांचे मार्गदर्शनात पाेलीस निरीक्षक फाल्गुन घाेडमारे , पाेहवा दिनेश शिवले,नापाेशि रविकांत डहाट,पाेशि मंगेश कळवे ,किशाेर कैकाडे,शिशुपाल वानखेडे, सर्व लाप्रवि,नागपुर यांनी यशस्वि कामगिरी केली आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours