मुंबई, 23 मे- 17 व्या लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात चार टप्प्यांत मतदान पार पडलं. त्यानंतर आता कुणाला किती जागा मिळणार? हे आजचे निकाल सांगणार आहे. थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होईल. उत्तर महाराष्ट्राबाबतही अशीच चर्चा सुरु असून भाजप-शिवसेना युतीसमोर मागील लोकसभा निवडणुकीतील कामगिरी कायम राखण्याचं मोठं आव्हान आहे. भाजपचे दिग्गज नेते गिरीश महाजन आणि एकनाथ खडसेंची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
उत्तर महाराष्ट्रात लोकसभेच्या 8 जागा असून त्यामध्ये नगर दक्षिण, शिर्डी, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, दिंडोरी आणि रावेर या मतदारसंघांचा समावेश आहे. मागच्या लोकसभा निवडणुकीत युतीनं उत्तर महाराष्ट्रात एकहाती विजय मिळवत उत्तर महाराष्ट्रातील आठही जागा जिंकल्या होत्या. पण यावेळी सगळ्या जागा कायम राखणं भाजपसाठी आव्हानात्मक ठरणार आहे. कारण यंदा प्रत्येक मतदारसंघात तुल्यबळ लढत होत आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours