पुणे, 9 मे :  पुणे शहरातील उरळी देवाची येथील राजयोग साडी सेंटर नावाच्या दुकानात भीषण आग लागली आहे. या अग्नितांडवात पाच कामगारांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अथक परिश्रमांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे. अग्निशमन दलाला गुरुवारी (9 मे) पहाटे 4.30 वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची माहिती मिळाली. यानंतर अग्निशमन दलाचे जवान तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत आगीनं रौद्ररूप धारण केलं होतं.
ज्यावेळी ही दुर्घटना घडली त्यावेळेस दुकानात पाच कामगार होते. हे पाचही कामगार साखरझोपेत असताना दुकानाला आग लागली. या दुर्घटनेत पाचही जणांचा गुदमरून आणि होरपळून मृत्यू झाला. पाचही कामगारांचे मृतदेह दुकानाबाहेर काढण्यात आले आहेत. दरम्यान, ही आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली, याबाबतची ठोस माहिती स्पष्ट झालेली नाही.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours