नवी दिल्ली, 11 मे: भाजप हा पक्ष कधीच फक्त अटल बिहारी वाजपेयी यांचा नव्हात, ना कधी अडवाणींचा होता आणि तो कधीच फक्त अमित शहा किंवा नरेंद्र मोदींचा पक्ष असणार नाही, अशा शब्दात भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पक्षाबद्दल सांगितले. भाजप हा मोदी केंद्रीत पक्ष झाल्याच्या प्रश्नावर ते बोलत होते. हा पक्ष कधीच व्यक्ती केंद्रीत होणार नसल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले.
भाजप हा पक्ष विचारधारेवर उभा राहिला आहे. त्यामुळे तो कधीच एका व्यक्ती पुरता मर्यादीत राहणार नाही. याआधी देखील ते अटल जी किंवा अडवाणी जी यांच्या पुरता मर्यादीत नव्हता आणि आता देखील तो केवळ अमित शहा किंवा नरेंद्र मोदी यांच्या पुरता मर्यादित राहणार नाही. पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. लोकसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार हा अंदाज देखील त्यांनी फेटाळून लावला. यंदा भाजपला गेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा अधिक मते मिळतील असा दावा त्यांनी केला.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours