धुळे : धुळे लोकसभा निवडणुकीत भाजपने विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्यावर भिस्त दाखवली. त्यांच्याविरोधात काँग्रेसने कुणाल पाटील यांना उमेदवारी दिली. 2009 आणि 2014 मध्ये सलग विजय मिळवल्यानंतर आता भाजप पुन्हा एकदा विजय मिळवणार का याची चर्चा आहे. इथे मुख्य लढत भाजप आणि काँग्रेसमध्येच आहे. 
धुळ्यामध्ये 29 एप्रिलला मतदान
धुळ्यामध्ये चौथ्या टप्प्यात 29 एप्रिलला मतदान झालं. इथे 52. 42 टक्के इतक्या मतदानाची नोंद झाली. 2009 मध्ये इथे फक्त 42.54 टक्के मतदानाची नोंद झाली होती. मागच्या निवडणुकीत भाजप - शिवसेना युतीला मोदी लाटेचा फायदा झाला.
सुभाष भामरेंचा विजय
मागच्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे सुभाष भामरे यांनी अमरीश पटेल यांचा 30 हजार मतांनी पराभव केला होता. सुभाष भामरेंना 5 लाख 29 हजार 450 मतं मिळाली तर अमरीश पटेल यांना 3 लाख 98 हजार 727 मतं मिळाली. 
23 मे ला निकाल
धुळे लोकसभा मतदारसंघात धुळे ग्रामीण, धुळे शहर, सिंदखेडा, मालेगाव सेंट्रल, मालेगाव आउटर आणि बागलाण हे विधानसभा मतदारसंघ येतात. 
या मतदारसंघात मतदारांचा कौल भाजपला आहे की काँग्रेसला हे 23 मे ला च कळू शकेल. 
उत्तर महाराष्ट्रात धुळे,रावेर,जळगाव,नंदुरबार अशा जागांवर भाजप - शिवसेना युतीची कामगिरी कशी होते याबदद्ल सगळ्यांनाच उत्सुकता आहे. 
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours