गडचिरोली, 19 मे- माओवाद्यांचे आज रविवारी गडचिरोली जिल्हा बंदचे आवाहन केले आहे. गडचिरोली जिल्ह्यात गेल्या 27 एप्रिल रोजी झालेल्या चकमकीच्या विरोधात माओवाद्यांनी गडचिरोली जिल्हा बंदचे आवाहन केले आहे. गेल्या 1 मेपासून जिल्हयात माओवाद्यांनी सुरु केलेल्या हिंसक कारवाया लक्षात घेता संपूर्ण जिल्ह्यासह तीन राज्याच्या सीमावर्ती भागात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.
दरम्यान, तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर आज सिरोंचा तालुक्याच्या सीमेवरील कालेश्वर मेडीगड्डा प्रकल्पाला भेट देणार आहेत. या पार्श्वभूमीवर तेलंगणाच्या सुरक्षा यंत्रणांनी सीमेवर बंदोबस्त करुन या भागाच्या सीमांवर भागावर लक्ष केंद्रीत केले आहे तर दुर्गम भागातल्या पोलीस ठाण्यांच्या सुरक्षा बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. सतर्कतेच्या सुचना पोलीस ठाण्याना देण्यात आल्या आहेत.
ठिकठिकाणी लावले लाल बॅनर
माओवाद्यांनी दुर्गम भागात काही ठिकाणी लाल रंगाचे बॅनर मोठ्या प्रमाणात लावले आहेत. या बॅनरच्या माध्यमातून माओवाद्यांनी येत्या 19 मे रोजी गडचिरोली जिल्हा बंदचं आवाहन केलं आहे. एट्टापली तालुक्यातील गुरूपल्ली मार्गावर तसेच आलापल्ली मार्गावर तसेच भामरागड मार्गावर माओवाद्यांनी बॅनर लावले आहेत. धक्कादायक म्हणजे, गडचिरोली सी-सिक्स्टी पोलीस कमांडो पथकाचाही बॅनरवर उल्लेख करण्यात आला आहे.
गेल्या 2 मे रोजी रामको तसेच शिल्पा ध्रुवा या महिला माओवाद्यांना खोटया चकमकीत मारल्याचा आरोप माओवाद्यांनी केला आहे. या बनरमुळे दुर्गम भागात दहशतीचे सावट पसरले आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours