मुंबई- अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्यप्रकरणी सीबीआयने सनातन संस्थेचे वकील संजीव पुनाळेकर आणि त्यांचे सहायक विक्रम भावे  या दोघांना मुंबईतून अटक केली आहे. सीबीआयचे अधिकारी दोघांना पुण्यात घेऊन गेले आहेत. रविवारी सकाळी 11 वाजता पुणे कोर्टात या दोघांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे. संजीव पुनाळेकर हे या हत्याकांडातील आरोपींचेही वकील आहेत.

सनातन संस्थेचे सल्लागार असलेले संजीव पुनाळकर गेल्या अनेक दिवसांपासून सीबीआयच्या रडारवर होते. अखेर आज सीबीआयने त्यांच्याभोवती फास आवळला. डॉ. दाभोळकर हत्याप्रकरणी ताब्यात घेतलेले सचीन अंदुरे आणि शरद कळसकर यांच्या चौकशीत पुनाळकर यांचे नाव पुढे आल्याची सुत्रांची माहिती आहे. पुनाळकरांनी गौरीलंकेश हत्या प्रकरणात आरोपींना मदत केल्याची आरोपींनी कबूली दिली होती.  डॉ. दाभोळकर हत्याप्रकरणी पुरावे नष्ट करणे, आरोपींना मार्गदर्शन करणे, हत्येच्या कटात सहभागी होणे  असे आरोप संजीव पुनाळेकरवर तर आरोपींना प्रत्यक्ष घटनास्थळ रेकी, दाभोळकरांची ओळख करुन देणे,  हत्येच्या कटात सहभागी होणे या आरोपाखाली विक्रम भावे याला अटक करण्यात आली आहे. पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश प्रकरणात आरोपींनी दिलेल्या कबुली जबाबात ही संजीव पुनाळेकरचे नाव समोर आले होते. तर विक्रम भावे गडकरी रंगायतन स्फोटातील आरोपी तसेच त्याचे मालेगाव ब्लास्ट कनेक्शन असल्याची माहिती मिळाली आहे. पुण्यात 20 ऑगस्ट 2013 रोजी मॉर्निंग वॉकला निघालेल्य डॉ. नरेंद्र दाभोलकरा यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती.

हल्लेखोरांनी नष्ट केली चार पिस्तुलं, सीबीआयचा दावा

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी वैभव राऊत आणि शरद कळसकर यांनी यावर्षी चार पिस्तुलं तोडून त्यांची मुंबई आणि ठाण्यात विल्हेवाट लावली. ही पिस्तुलं त्यांनी तोडून खाडीमध्ये फेकून दिली, असा दावा सीबीआयने केला आहे. हत्येच्या वेळी एकूण चार जण उपस्थित होते, असा दावाही सीबीआयने केला आहे. डॉ.दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, एम.एस.कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्येसाठी ही चार पिस्तुलं वापरण्यात आली होती का, हे आता तपासातून पुढे येणार आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours