मुंबई, 25 मे- डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयने हिंदु विधीज्ज्ञ परिषदेचे सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर आणि परिषदेचे माहिती अधिकार कार्यकर्ता विक्रम भावे यांना केलेल्या अटकेचा सनातन संस्थेने निषेध केला आहे. सनातन संस्थेचे  राष्ट्रीय प्रवक्ता चेतन राजहंस यांनी प्रसिद्धीपत्रक काढून संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना केलेली अटक ही निषेधार्ह असल्याचे म्हटले आहे.
केंद्रात हिंदुत्ववादी शासन सत्तारूढ असताना संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना अटक होणे, यामागे षडयंत्र आहे. सनातन संस्थेवर दबाव आणण्याच्या पुरोगाम्यांच्या मागणीपुढे सीबीआय झुकली आहे. मालेगाव स्फोटप्रकरणी भगवा आतंकवादाचा खोटेपणा ज्यांनी सिद्ध केला. ज्यांनी समाजाच्या हितासाठी अनेक याचिका केल्या, त्या अधिवक्ता पुनाळेकर यांना अटक करणे गंभीर आहे. समाज, राष्ट्र आणि धर्म यांची निरपेक्षपणे सेवा करणारे अधिवक्ता पुनाळेकर निर्दोष आहेत, ही आमची भावना आहे. अधिवक्ता पुनाळेकर यांना देशभरातील समाजसेवा, देशभक्त आणि हिंदुत्ववादी संघटना, तसेच अधिवक्ते यांनी पाठिंबा दिल्याचे चेतन राजहंस यांनी म्हटले आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours