डोंबिवली, 5 मे- बीड जिल्ह्यातील पिंपळनेर येथे एका 19 वर्षीय तरुणावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना ताजी असताना डोंबिवलीतील कोळेगावात एका अल्पवयीन मुलाला अश्लील (पॉर्न ) व्हिडीओ दाखवून त्याच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आला आहे. या प्रकरणी आरोपी दिनेश लावहरी (वय-33) याला मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे.
काय आहे प्रकरण?
पीडित मुलगा 9 वर्षांचा आहे. आरोपी मुलाच्या घराशेजारी पत्नीसोबत राहातो. आरोपीने मुलाला आपल्या घरी नेले. आरोपीने आधी मुलाला अश्लील व्हिडीओ दाखवला. नंतर त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला. एवढेच नाही तर आरोपीने मुलाला मारहाणही केली. आपल्या मुलाला मारहाण झाल्याची माहिती मुलाच्या आईला समजली. 'दिनेश काकाने का मारले', अशी विचारणा केली असता मुलाने आईला आपबिती सांगितली. त्यानंतर, पीडित मुलाच्या आईने मानपाडा पोलिसांत आरोपी दिनेश लावहरी याच्या विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत आरोपीच्य मुसक्या आवळल्या. हा घृणास्पद प्रकार समोर आल्याने डोंबिवली शहरात एकच खळबळ उडाली आहे.

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours