डोंबिवली : डोंबिवलीमध्ये राहणाऱ्या कॅरमपटूचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. राष्ट्रीय स्तरावरील कॅरमपटू जान्हवी मोरेचा अपघातात मृत्यू झाला आहे. पलावा सिटी सर्कल इथं डंपरने उडविल्यानं तिचा जागीच मृत्यू झाला आहे. या संपूर्ण घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. तर क्रीडा प्रेमींमध्ये या घटनेमुळे शोककळा पसरली आहे.

रविवारी संध्याकाळी पलावा सिटी सर्कल इथं जान्हवी मोरेला डंपरनं उडवलं. यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला आहे. जान्हवीच्या पश्चात आई-वडील आणि लहान भाऊ असा परिवार आहे. आज सकाळी डोंबिवलीत तिच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours