नाशिक, 6 मे- इव्हीएम स्ट्राँग रूममध्ये जॅमर बसवा, काँग्रेसने केलेल्या मागणीवर भाजप नेते गिरीश महाजन यांनी खोचक टीका केली आहे. निवडणूक आयोगावर विश्वास नसेल तर काँग्रेस नेत्यांनी इव्हीएम स्ट्रॉंग रूम बाहेर झोपावे. तसेच काँग्रेसने आपली टीम तयार करून स्ट्रॉंग रूम बाहेर पहारा द्यावा, अशा शब्दांत गिरीश महाजन यांनी काँग्रेसला टोला लगावला आहे. पराभव दिसू लागल्याने काँग्रेस कारण शोधत असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
पालकमंत्री या नात्याने गिरीश महाजन सध्या नाशिक जिल्ह्यात दुष्काळी दौऱ्यावर निघाले आहेत. दरम्यान, दुष्काळ दौऱ्यात एकही प्रशासकीय अधिकारी नसल्याने गिरीश महाजन यांनी सकाळी नाराजी व्यक्त केली होती. तसेच त्यांना संतप्त शेतकऱ्यांच्या संतापालाही सामोरे जावे लागले होते. नंतर महाजन यांनी फोनवरुन संबंधित अधिकाऱ्यांची कानउघाडणीही केली होती. उद्यापासून दुष्काळ दौऱ्यात अधिकारी उपस्थित राहणार आहेत. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाचे पत्र राज्य सरकारला प्राप्त झाल्याची माहितीही महाजन यांनी दिली आहे.

EVM स्ट्राँग रूममध्ये जॅमर बसवण्याची मागणी.. 
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्त्वातील काँग्रेस शिष्टमंडळाने राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांची भेट घेतली. इव्हीएमबाबतच्या विविध मागण्यांच्या संदर्भात काँग्रेस नेत्यांकडून ही भेट घेण्यात आली आहे.
'इव्हीएमबाबत खबरदारी घेतली पाहिजे. सर्व इव्हीएम या स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात आल्या आहेत. या मशीन्सला कुणी मोबाइल टॉवर, वायफाय नेटवर्कच्या माध्यमातून टॅम्पर करू नये, म्हणून जॅमर बसवण्यात यावेत. तसेच प्रत्येक राउंड निकाल जाहीर केला पाहिजे,' अशा मागण्या काँग्रेसकडून करण्यात आल्या आहेत.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours