नवी दिल्ली : विमान खरेदी घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांच्या अडचणी वाढणार आहेत. या प्रकरणी चौकशीसाठी पटेल आज दुसऱ्या दिवशी ईडीच्या ऑफिसमध्ये चौकशीसाठी हजर झाले. त्यांची तब्बल साडे 9 तास चौकशी करण्यात आली. तर सोमवारी त्यांची 8 तास चौकशी झाली होती. गेल्या दोन दिवसांमध्ये त्यांची साडे 17 तास चौकशी करण्यात आली. पटेल यांना गेल्या दोन दिवसांमध्ये 100 पेक्षा जास्त प्रश्न विचारण्यात आले अशी माहिती सूत्रांनी दिलीय.
चौकशीसाठी ईडीने पटेलांना दुसरी नोटीस पाठवली होती. युपीएच्या काळात 2004 ते 2011 या काळात पटेल हे नागरी उड्डयन मंत्री असताना या घोटाळ्याचा आरोप झाला होता. त्यामुळे पटेलांची चौकशी करणं महत्त्वाचं असल्याचं ईडीने म्हटलं आहे.
या आधीही ईडीने पटेलांना चौकशीसाठी नोटीस पाठवली होती. 6 जूनला हजर राहावं असं त्यांना सांगण्यात आलं होतं. मात्र पटेलांनी दुसरी तारीख मागितली होती त्यामुळे त्यांना दुसरी नोटीस पाठवण्यात आली होती. प्रफुल पटेल हे राष्ट्रवादीचे राज्यसभेचे खासदारही आहेत.
Post A Comment:
0 comments so far,add yours