मुंबई- 11 जून- अहमदाबादमधीस स्पेशल NIA कोर्टाने मंगळवारी मुंबईतील एका बिझनेसमनला प्लेन हायजॅकिंगची धमकी दिल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच त्याला 5 कोटी रुपयांचा दंडही ठोठावला आहे. बिरजू सल्ला असे दोषीचे नाव आहे. देशातील हे पहिलेच प्रकरण आहे. एंटी हायजॅकिंग अॅक्टनुसार जन्मठेपेच्या शिक्षेसह 5 कोटींच्या दंडाची शिक्षा झालेला बिरजू सल्ला हा देशातील पहिला दोषी आहे.
बिरजू सल्ला ऑक्टोबर, 2017 मध्ये जेट एअरवेजचे एक विमान हायजॅक करण्याची धमकी दिली होती. नंतर संबंधित विमानाचे इमरजन्सी लँडिंग करावे लागले होते. दोषी बिरजू सल्ला याने दंडाची रक्कम भरल्यानंतर ती रक्कम त्यावेळी विमानात असलेले क्रू मेंबर्स आणि प्रवाशांमध्ये वितरित करण्यात येईल, असे आदेश स्पेशल एनआयए कोर्टाने दिले आहेत.
दोषी बिझनेसम बिरजू सल्ला हा 30 ऑक्टोबर, 2017 रोजी जेट एअरवेजच्या फ्लाइटने (9W339)मुंबईहून दिल्लीला जात होता. एअरक्राफ्टच्या टॉयलेटमधील टिश्यू पेपरच्या बॉक्सवर इंग्रजी आणि उर्दूत प्लेन हायजॅकिंगची धमकी दिली होती. प्लेन हायजॅक करून ते पाक व्याप्त काश्मीरमध्ये नेण्याबाबत सल्ला याने दिलेल्या धमकीत म्हटले होते. सल्लाने धमकीचे पत्र 'अल्लाह-ओ-अकबर' या शब्दांनी समाप्त केले होते. नंतर प्लेनमधील प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला होता. या धमकीनंतर अहमदाबाद एअरपोर्टवर इमरजन्सी लँडिंग करण्यात आले होते. त्यानंतर बिरजू सल्ला याला अटक करण्यात आली होती. या घटनेनंतर सल्ला याला 'नॅशनल नो फ्लाई लिस्ट'मध्ये
Post A Comment:
0 comments so far,add yours