लंडन, 21 जून : ICC Cricket World Cup स्पर्धेत सध्या भारतीय संघाची विजयी घौडदौड सुरु आहे. तीन सामन्यात विजय मिळवल्यानंतर भारतीय संघ गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर आहे. विराटसेना आपला पुढचा सामना शनिवारी अफगाणिस्तान विरोधात खेळणार आहे. मात्र, खेळाडूंच्या दुखापतींची संख्या वाढल्यामुळं कर्णधार विराट कोहलीची चिंता वाढली आहे. भारताचा धडाकेबाज फलंदाज शिखर धवनला दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेऱ पडावे लागले, त्यातच भारताचा जलद गोलंदाज भुवनेश्वर कुमारही दुखापतींमुळं काही सामने खेळणार नाही आहेत. यातच भारताचा अष्टपैलू विजय शंकरला दुखापत झाल्याच्या बातम्या होत्या. मात्र, विजय शंकर आता फिट झाला असल्यामुळं शनिवारी अफगाणिस्तान विरुद्ध तो खेळू शकतो.
अफगाणिस्तान विरुद्ध होणाऱ्या सामन्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत बुमराहनं, "नेटमध्ये सराव करताना कोणताही फलंदाज जखमी व्हावा अशी इच्छा नसते. विजय शंकर जखमी झाला, पण आता तो ठीक आहे". गुरुवारी पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार विजय शंकरला सरावावेळी दुखापत झाली होती. नेटमध्ये फलंदाजी करताना जसप्रीत बुमराहचा यॉर्कर पायाला लागला.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours