मुंबई, 21 जून : शिवसेनेनं विधानसभा निवडणुकीसाठी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. शिवसेना भवनात आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रातील सर्व 288 विधानसभा मतदारसंघातील संपर्कप्रमुख आणि सहसंपर्कप्रमुखांची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे.
शिवसेनेच्या आज होणाऱ्या बैठकीत महायुतीच्या सर्व उमेदवारांच्या विजयासाठी उद्धव ठाकरे शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत. विधानसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार कोणीही असो, त्याच्या विजयासाठी महायुतीच्या सर्व पक्षांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करावं यासाठी हे मार्गदर्शन होणार आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. शिवसेनेनंही त्यादृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत. महाराष्ट्राचं मुख्यमंत्रिपद मिळवण्याच्या शिवसेनेच्या महत्त्वाकांक्षा काही लपून राहिल्या नाहीत. नुकत्याच झालेल्या शिवसेनेच्या वर्धापनदिनी उद्धव ठाकरे यांनी सामनातून याबाबत जाहीर भाष्य केलं होतं. त्यामुळे आजच्या बैठकीतही त्याचदृष्टीने अजेंडा ठरवला जाण्याची शक्यता आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours