मुंबई, 15 जून : खासदार इम्तियाज जलील यांच्या अभिनंदनाचा वेगळा ठराव मांडा, यासाठी एमआयएमच्या नगरसेवकांनी औरंगाबाद महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रचंड गोंधळ घातला. सभागृहात धुडगूस घालत नगरसेवकांनी राजदंडदेखील पळवला. या गोंधळावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून एमआयएमवर हल्लाबोल केला आहे. 'लोकसभा निवडणुकीत एक निसटता पराभव अपघाताने झाला म्हणून संभाजीनगरचा हिंदू नामर्द बनलेला नाही. संभाजीनगरातील ‘औरंगाबादे’त घुसून औरंग्याच्या पिलावळीस ठेचून काढण्याची हिंमत हिंदूंच्या मनगटात आहे. हिंदूंच्या अंगावर येणाऱ्या सगळ्यासाठीच हा इशारा आहे. आपल्यातीलच एका खानाने हाती हिरवे फडके बांधून त्याने औरंग्याच्या कबरीवर जरूर नमाज अदा करावेत, पण शिवसेना-भाजप युतीने आपला ‘धर्म’ सोडलेला नाही. संभाजीनगरच्या अस्मितेसाठी व हिंदूरक्षणासाठी शिवसेनेचा लढा चालूच राहील. ओवेसीछाप टोळक्यास उचलून बाहेर फेकल्याबद्दल संभाजीनगर महापालिकेचे अभिनंदन! हे काल घडले, उद्याही घडेल', अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी टीकास्त्र सोडले आहे.
काय आहे आजचे सामना संपादकीय?
- जेथे औरंग्यास गाडले किंवा पुरले त्या संभाजीनगरात हिरव्या विषाला पुन्हा उकळी फुटली आहे. महाराष्ट्रातच काय, संपूर्ण देशभरात हिंदुत्वाची लाट उसळली असताना लोकसभा निवडणुकीत संभाजीनगरचा निर्णय विचित्र लागला. गेली 30 वर्षे संभाजीनगरवर डौलाने फडकणारा भगवा उतरवणारे हात आपल्यातल्याच सूर्याजी पिसाळांचे होते. हैदराबादच्या ओवेसी पक्षाचे इम्तियाज जलील विजयी झाले तेव्हाच संभाजीनगरच्या इतिहास, भूगोल आणि संस्कृतीस धक्का बसला. यापुढे काय घडणार आहे त्याचे प्रात्यक्षिक संभाजीनगर महापालिकेत गुरुवारी झालेल्या राड्यावरून स्पष्ट झाले.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours