मुंबई, 10 जुलै : 'काँग्रेस नेते डे.के शिवकुमार आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांच्यापासून आमच्या जीवाला धोका आहे,' असं पत्र कर्नाटकच्या 10 बंडखोर आमदारांनी मुंबई पोलिसांना लिहीलं आहे. आमदारांच्या या आरोपामुळे राजकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे.
कर्नाटकमधील 10 बंडखोर आमदार सध्या मुंबईतील एका हॉटेलमध्ये थांबले आहेत. या आमदारांची समजूत काढण्यासाठी कर्नाटकमधील काँग्रेसचे दिग्गज नेते अशी ओळख असलेले डी.के. शिवकुमार हेदेखील आता मुंबईत दाखल झाले आहेत. मात्र ज्या आमदारांना भेटण्यासाठी शिवकुमार आले त्याच आमदारांनी शिवकुमार यांच्यापासून आमच्या जीवाला धोका असल्याची तक्रार केली आहे.
'शिवकुमार आणि कुमारस्वामींना भेटण्याची इच्छा नाही' असंही बंडखोर आमदारांनी मुंबई पोलिसांनी लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. सध्या सगळे 10 आमदारा रेनिसान्स हॉटेलमध्ये असून कडक सुरक्षेत त्यांना ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे आमदारांची समजूत काढण्यासाटी आलेल्या डीके शिवकुमार यांना पोलिसांनी हॉटेलबाहेरच रोखलं आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours