मुंबई, 10 जुलै: मुंबई शहर आणि उपनगरात सुरु झालेल्या पावसामुळे लोकल सेवा विस्कळीत होण्याचे प्रमाण वाढले आहे. पावसाचा सर्वाधिक फटका मध्य रेल्वेला बसला होता. आज देखील पुन्हा एकदा मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. मध्य रेल्वेची कल्याण, कर्जत आणि कसारा मार्गावरील वाहतूक सकाळी ऐन गर्दीच्या वेळी विस्कळीत झाल्याने मुंबईकरांचे पुन्हा एकदा हाल झाले. तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक 20 ते 25 मिनिटे उशिराने धावत धावत आहे.

मध्य रेल्वेला केला जाणारा वीजपुरवठा कट झाल्याने ही वाहतूक विस्कळीत झाली आहे. टाटा पॉवरचा वीजपुरवठा कट झाल्याने त्याचा परिणाम लोकल वाहतुकीवर झाल्याची घोषणा मध्य रेल्वेकडून करण्यात येत आहे. याचा सर्वात मोठा फटका कल्याण, कर्जत आणि कसारा मार्गावरील वाहतुकीवर झाला. कर्जतकडे जाणाऱ्या मध्य रेल्वेवरील गाड्या 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत आहेत. तर कसारा मार्गावरील गाड्या 20 ते 25 मिनिटे उशिराने धावत आहेत. तर कल्याणकडून सीएसटीएमकडे येणाऱ्या गाड्या 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत होत आहे. यामुळे मुंबईकरांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. काही दिवासांपूर्वी मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेला ठाणे ते सीएसएमटी मार्गावर 11 तास वाहतूक बंद ठेवावी लागली होती.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours