मुंबई, 2 जुलै: मुंबईत गेल्या 24 तासांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईची तुंबई झाली आहे. मालाडमध्ये पिंपरीपाडा परिसरात घरांवर भिंत कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. यामध्ये 12 जणांचा मृत्यू झाला असून 13 जण जखमी आहेत. तर जवळपास ढिगाऱ्याखाली 30 जण अडकल्याची शक्यता व्यक्त केली जातं आहे. एनडीआरएफ, अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरू आहे. मात्र मुसळधार पावसामुळे बचावकार्यात मोठा अडथळा येत असल्याची माहिती मिळत आहे.

राज्यात शनिवारपासून 27 जणांच मृत्यू
राज्यात गेल्या 4 दिवसांपासून सुरु असेलल्या पावसामुळे भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 27 जणांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी पुण्यातील कोंढवा भागात भिंत कोसळून 15 जणांचा मृत्यू झाला होता. त्यात मालाडमध्ये अशीच घटना घडली आहे. मध्यरात्री दोनच्या सुमारास ही घटना घडली. मालाडमधील कुरार भागात ही घटना घडली असून त्यात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. मालाडमध्ये सध्या मदत आणि बचाव कार्य सुरु आहे. अग्निशमन दलाचे जवान आणि एनडीआरएफ देखील मदत कार्य करत आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours