नाशिक, 25 जुलै : राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यातील ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे. पण आता या सर्व चर्चांचं स्वत: छगन भुजबळ यांनी खंडण केलं असून मी शिवसेनेत जाणार नाही, असं स्पष्ट केलं आहे.
'मी मांजरपाडा जलपूजन करतोय म्हणून त्यावरून लक्ष वळवण्यासाठी हा प्रयत्न केला जात आहे. ही एक राजकीय खेळी आहे. यावर मी योग्य वेळी बोलेल. पण या प्रकारच्या बातम्या निव्वळ अफवा आहेत,' अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप करण्याच्या तयारीत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते छगन भुजबळ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर हे शिवसेनेत पक्ष प्रवेश करणार असल्याचे मेसेज सध्या व्हायरल होत आहेत. या संदर्भात शिवसेनेच्या वरिष्ठ सूत्रांनी कोणताही दुजोरा मिळालेला नाही. अशातच आता भुजबळ यांनीही या चर्चा फेटाळल्या आहेत.
मात्र, सचिन अहिर हे आज शिवसेनेत पक्ष प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दुपारी 12 वाजता पत्रकार परिषदही बोलवली आहे. त्यामुळे सचिन अहिर दुपारीच शिवसेनेत प्रवेश करतील, अशी शक्यता आहे. सचिन अहिर यांचा शिवसेना प्रवेश राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का असणार आहे. कारण अहिर हे राष्ट्रवादीचा मुंबईतील प्रमुख चेहरा होते. तसंच ते माजी मंत्रीही राहिले आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादीला मुंबईत मोठी गळती लागू शकते.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours