कोल्हापूर, 25 जुलै : एकीकडे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून मोठ्या प्रमाणात सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेत इनकमिंग सुरू आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस कोमात गेली आहे. अशातच दुसरीकडे पक्षाला आणखी एक मोठा धक्का मिळाला आहे. राष्ट्रवादीचे कोल्हापुरातील कागल येथील मोठे नेते आणि आमदार हसन मुश्रीफ यांच्या मालमत्तांवर आयकर विभागानं छापा टाकला आहे. गुरूवारी (25 जुलै) पहाटेच्या सुमारास मुश्रीफ यांच्या निवासस्थानी, त्यांच्या मुलाच्या निवासस्थानी आणि साखर कारखान्यावर छापेमारीची कारवाई करण्यात आली.  हसन मुश्रीफ हे कोल्हापुरातलं मोठं नाव असून शरद पवारांच्या जवळचे आणि विश्वासू नेते मानले जातात.
नेमकं काय घडलं?  
हसन मुश्रीफ बुधवारी (24 जुलै) मुंबईत होते. गुरूवारी (25 जुलै) सकाळी ते आपल्या कागलमधील निवासस्थानी पोहोचले. यानंतर काही वेळात आयकर विभागाचं पथक त्यांच्या घरी पोहोचलं. जवळपास 30 ते 40 जणांच्या पथकानं त्यांच्या निवासस्थानी चौकशी सुरू केली आहे. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी झालेली ही कारवाई मुश्रीफ यांना धक्का असल्याचं मानलं जात आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours